बालाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत यश

कोरेगाव भीमा- शिर्डी सांस्कृतिक महोत्सव 2018 मध्ये भव्य जिल्हास्तरीय शालेय नृत्य स्पर्धा शिर्डी येथे आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये चाळीस शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यामधून बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई) शिरुरच्या विद्यार्थ्यांनी लहान आणि मोठ्या गटामध्ये दुसरा क्रमांक पटकावला. या शाळेच्या नृत्य प्रशिक्षिका श्रध्दा गांधी यांनी अथक परिश्रम घेतले. या संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, मुख्याध्यापक गणेश मिटपल्लीवार, शैक्षणिक संचालिका शुभ्रा लाहिरी, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार के.बी.सोनवणे, व्यवस्थापक सुनील शिंदे, उपप्राचार्या स्वाती चत्तर आणि सोनाली परदेशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)