बालाजी नागरगोजे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर या महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक बालाजी नागरगोजे यांना राज्यस्तरीय पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रवींद्र भोळे, डॉ. मिलिंद चौधरी, कुंदन ढाके आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे येथील बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानससेवा ट्रस्ट नेहरु युवा केंद्र, क्रीडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार संलग्न व महाराष्ट्र राष्ट्रसेवा समितीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. बालाजी नागरगोजे यांनी शाळा स्तरापासून ते राज्यस्तरापर्यत उल्लेखणीय काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. हाळदे, पर्यवेक्षक जे. ए. सुपेकर यांनी नागरगोजे यांचे अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)