बालसुधारगृहातील दिवाळी पहाट ठरली आनंददायी

आमदारांच्या उपस्थितीत मुलांना अभ्यंगस्नान, फराळ वाटप
कराड, दि. 6 (प्रतिनिधी) – मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे बालसुधारगृहासह अंध मुली आणि मदरशातील मुस्लीम मुलांची दिवाळी पहाट आनंददायी ठरली. आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी अनाथ मुलांना अंघोळ घालून फराळ आणि कपड्यांचे वाटप केले.
माजी नगरसेवक दादा शिंगण हे सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात. त्यांच्या सामाजिक कार्याशी कराडकर परिचित आहेत. बालसुधारगृहातील अनाथ मुलांसाठी ते दरवर्षी दिवाळ पहाट उपक्रम राबवितात. तसेच याठिकाणी मदरशातील मुले, अंध मुलींनाही बोलावून त्यांना दिवाळी फराळ आणि साहित्याचे वाटप करतात. यंदाही दिवाळीच्या पहिल्या दिवशी (मंगळवारी) येथील कै. माधवराव जाधव मुलांच्या बालगृहात अनाथ मुलांबरोबर दिवाळीची पहिली पहाट साजरी करण्यात आली. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, पंचायत समितीच्या सभापती सौ. फरीदा इनामदार, माजी सभापती देवराज पाटील, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, माजी नगरसेवक दादा शिंगण, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, डी. जी. पवार, आर. टी. स्वामी यांच्यासह आजी माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील यांच्यासह मान्यवरांनी बालसुधारगृहातील 60 अनाथ मुलांना सुगंधी उटणे लावून अंघोळ घातली. त्यानंतर त्यांना दिवाळी फराळ आणि कपडे देण्यात आले. मदरशातील 100 मुलांना दिवाळी फराळ, टोपी आणि नमाज पठणासाठी बसायचा रूमाल दिला. 5 अंध मुलींना फराळ आणि कपडे देण्यात आले. या उपक्रमामुळे त्यांची दिवाळी पहाट आनंददायी ठरली. आ. पाटील यांच्यासह मान्यवरांनी दादा शिंगण यांच्या उपक्रमाचे कौतुक करून सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
106 :thumbsup:
52 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)