बालवारीतून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा संदेश

मंचर-आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या या मुलांनी आपल्या वडीलांनी चुक केली व आम्हाला संकटात टाकून निघून गेले. त्यांच्यानंतर आमचे काय हाल होतील. हे पाहण्यास ते राहिले नाही, असे सांगत शेतकऱ्यांची किती बिकट अवस्था आहे. यावर विचार मांडताना कितीही अडचणी आल्या तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन आत्महत्याग्रस्त मुलांनी केले. दरवर्षी पाचविला पुजलेला दुष्काळ अवकाळी गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होत असल्याने या आत्महत्या रोखण्यासाठी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसावली आहेत.
मंचर येथील एसटी बसस्थानकात आधारतीर्थ आधार आश्रमातील मुलांनी बळीराजा वाचवा प्रबोधन यात्रा काढून जनजागृती करण्यात आली. सर्वत्र दुष्काळी स्थिती असताना जगाचा पोशिंदा शेतकरी विविध अडचणीनी त्रासला असून तो निराश होऊन मोठ्या आत्महत्या करू लागला आहे. मंचर बसस्थानकात आधारतीर्थ आधार आश्रमातील मुले आली होती. या मुलांचे स्वागत उपहारगृह मालक बबलु गुप्ता, दिनेश गुप्ता, पोपट थोरात, कमल किशोर अवस्थी यांनी केले. आधारतीर्थचे संस्थापक त्र्यंबक गायकवाड, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे माजी अधिकारी रेवजी वाळुंज हे प्रबोधन दिडींचे मार्गदर्शक आहे.
या प्रबोधन दिंडीतील चिमुकल्या मुलांनी गाणे सादर करून उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांनो कोणतेही संकट आले तरी आत्महत्या करू नका, आमच्या वडीलांनी चुक केली, तुम्ही करू नका, असा हृदयस्पर्शी संदेश देत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी विविध प्रबोधनात्मक गीते सादर करत उपस्थितांना चिंतन करण्यास भाग पाडले. आमच्या वडीलांनी आत्महत्या केली. तशी चुक तुम्ही करू नका, असा संदेश देत शेतकऱ्यांना आवाहन करीत आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठे वाढले आहे.त्यामुळे अनेक मुले अनाथ होत असून त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी आधारतीर्थ या संस्थेने स्वीकारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ही मुले संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतून आळंदी ते पंढरपूर पर्यंत समाजप्रबोधनाची जबाबदारी पार पडत आहेत.

  • आधारतीर्थने दिला आधार
    वारीमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करताना डोक्‍यावर संदेश लिहलेली टोपी, हातीटाळ आणि मृदंग घेऊन विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत किर्तनातून ही मुले आत्महत्या रोखण्याचा संदेश देत आहे. बळीराजाचे राज्य येऊ दे, मायबाप सरकारला जाग येऊ दे विठ्ठला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव असा संदेश हे बालवारकरी देत आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठे वाढले आहे. त्यामुळे अनेक मुलेअनाथ होत असून त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी आधारतीर्थ या संस्थेने स्वीकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)