बालवडीत विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

भोर- भोर तालुक्‍यातील वीसगांव खोऱ्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या बालवडी प्राथमिक शाळेस पुणे येथील सिपल फाउंडेशनचे हिमल दोशी यांचे सौजन्याने इयत्ता 5 वी आणि 7 वीच्या 14 गुणवंत, तसेच गरजू विद्यार्थ्यांना भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती श्रीधर किंद्रे आणि गट विकास अधिकारी संतोष हराळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात गट विकास अधिकारी संतोष हराळे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच चांगले आरोग्य असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी शाळेस भौतिक सोयीसुविधा पुरवण्याचे या वेळीअश्वासन दिले. कार्यक्रमात भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्षपदी सुदाम ओंबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भोर तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मदने, शिक्षक सहकारी पत संस्थेचे संचालक प्रदीप बदक, सरपंच ऍड. विकास किंद्रे, माजी सरपंच अतुल किंद्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापू निकम, उपाध्यक्षा निर्मला किंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष भिकाजी किंद्रे, ग्रामसेवक कांबळे यांसह शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक भीमराव शिंदे, सहशिक्षक महादेव बदक, आनंदा सावले, अंजना घोलप, यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवला गेला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)