बालमजुरीला चॅलेंज करणारा शांतीदूत कैलास सत्यार्थी

कोण हे कैलास सत्यार्थी? हा प्रश्‍न 2014 मध्ये ज्यावेळी शांततेचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले, त्यावेळी प्रत्येक भारतीय विचारत होता. ज्या व्यक्तीने लाखापेक्षा अधिक बालकांना त्यांचा जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते, हीच खूप मोठी शोकांतिका आहे. बालकांचे अपहरण करून, त्यांचा व्यवहार करून, काही लोकांच्या आर्थिक गरजेपोटी त्यांना उपाशी ठेवून 18-18 तास काम करायला लावले जाते. बालकांचे लैंगिक शोषण करून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात दिला जातो. देशातील अशा एक लाखाहून अधिक मुलांना या सर्व गुन्हेगारीतून मुक्त करून, त्यांच्यातील बालक जिवंत करीत त्यांना पुन्हा जगण्याचे बळ देणारे, शांततेचे नोबेल पुरस्कार मिळालेले एक प्रेरक व्यक्तिमत्व म्हणजे कैलास सत्यार्थी होय.

कैलास सत्यार्थी यांच्या आयुष्यातून आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. सामान्य कुटुंबात झालेला जन्म त्यांना एक संवेदनशील माणूस म्हणून घडविण्यास कारणीभूत झाला. सत्यार्थी लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले. मात्र, आईने त्यांच्यावर केलेले समाजसेवेचे संस्कार त्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी कोरले गेले. शाळेत असल्यापासूनच सत्यार्थी यांच्या मनामध्ये जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, ज्यांना कपडे घालायला मिळत नाहीत, शिक्षणाचे वय असतानाही ज्यांना वडिलांचा व्यवसाय करावा लागतो अशांसाठी करूणेचा भाव होता. स्वत:चे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी समाजाच्या भल्यासाठी अनेक कामे केलेली होती. समाजात असलेली असमानता, अस्पृश्‍यता, जातीयवाद नष्ट करण्यासाठी त्यांना खूप चित्रविचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागले. अनेकवेळा लोकांनी त्यांना वाळीतही टाकले. समाजाची मानसिकता बदलणे खूप कठीण आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मनोमन ठरविले होते की, काहीही झाले तरी आपण माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी उभे आयुष्यभर काम करायचे. पुढे चालून त्यांनी आपले कैलास शर्मा हे नाव बदलून कैलास सत्यार्थी केले. Give every child the wings of freedom, to dream, to fly in open sky म्हणत बचपन बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी लाखाहून अधिक बालकांना चुकीच्या कामातून, गुन्हेगारीतून, लैंगिक अत्याचारातून, बाल मजुरीतून मुक्त केलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– श्रीकांत येरुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)