बालभारती-पौड फाटा रस्ता मार्गी लागणार

file pic

पर्यावरण परिणाम अहवालासाठी अखेर संस्थांची नेमणूक

पुणे – विधी महाविद्यालय रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून बालभारती ते पौड फाटा हा टेकडीवरील रस्त्या प्रस्तावित केला आहे. या रस्त्यामुळे होणारे पर्यावरण, वाहतूक तसेच सामाजिक परिणामांचा अहवाल तयार करण्यासाठी अखेर दोन संस्थांची निवड झाली आहे. या कामासाठी 30 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईकडून औंध, बालेवाडीकडून कोथरूडकडे जाण्यासाठी तसेच शहराच्या दक्षिण उपनगरांमध्ये जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने 205 कलमांतर्गत बालभारती ते पौड फाटा असा रस्ता आखला होता. मात्र, हा रस्ता टेकडीवरून जाणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी त्यास विरोध केला होता. त्यानंतर ते न्यायालयातही गेले होते.

याच्या सुनावणीत न्यायालयाने हा रस्ता करण्यास महापालिकेस मनाई करत आधी या रस्त्याची आखणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पालिकेने हा रस्ता शहराच्या सुधारीत प्रारूप विकास आराखडा 2007 ते 2027 यामध्ये आखण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर न्यायालयाने या रस्त्याच्या कामास मंजूरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेकडून या कामासाठी आता पर्यावरण, वाहतूक तसेच सामाजिक व आर्थिक परिणाम तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. अखेर 2 संस्थांची निवड करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)