“चौदा’खडीचे आदेश 8 वर्षांपूर्वीचे!

बालभारती अडकली “बारा’ खडीतच : शिक्षण संचालकांनाच नाही माहिती

श्रध्दा कोळेकर

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.29 – गेल्या काही दिवसांपासून बाराखडीची चौदाखडी झाली असे सांगणारे मेसेजेस समाज माध्यमांवर फिरत आहेत. मात्र ही बाराखडीची चौदाखडी होऊन तब्बल आठ वर्षाचा काळ लोटला तरीही राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये मात्र अद्यापही मुलांना बाराखडची शिकवली जाते आहे. मुख्य म्हणजे बालभारतीच्या पुस्तकात बाराखडी आहे की चौदाखडी याची माहिती खुद्द शिक्षण संचालकांनाही माहिती नसल्याचे त्यांच्या वक्‍तव्यावरुन समोर येते आहे.

गेल्या काही काळापासून इंग्रजी किंवा अन्य भाषांचा वापर वाढला आहे. अनेक इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना ऍ आणि ऑ सारखे स्वर आपल्याला वापरावे लागतात. याची कबुली राज्य शासनानेच दिली आहे. त्यांनीच काढलेल्या 6 नोव्हेंबर 2009 साली काढण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, “सध्याच्या युगात संगणकाचा वापर अधिक होत आहे. राज्य शासनाने सर्व कार्यालयांमध्ये संगणकीकरण केलेले आहे. त्यामुळे शासन निर्णयाची भाषा मराठी असल्याने संगणकावर ते काम पार पाडणे गरजेचे आहे. संगणकावर काम करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये एकरुपता नाही. या सर्व बाबी लक्षात घेता वर्णमालेचे प्रमाणीकरण करणे गरजेचे होती त्यानुसार शासनाने मराठी भाषेची लीपी, वर्णमाला, वर्णक्रम अद्यायावत करायचे ठरवले आहे.’ मुख्य म्हणजे या शासन निर्णयाची दखल शासनाच्या सर्व विभागांनी व शैक्षणिक संस्था व प्राधिरणाने घेण्याच्याही सूचना आहेत. मात्र 2009 नंतर आतापर्यंत राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) यात कोणताही बदल केलेला दिसत नाही. बालभारतीचा इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम 2013 साली बदलण्यात आला होता. त्यानंतर चार आवृत्त्या काढण्यात आल्या, मात्र अद्यापही यामध्ये बदल केलेला दिसत नाही. त्यामुळे पुढची पिढी घणविणाऱ्या बालभारतीने आधी स्वत: अद्यायावत होणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.

-Ads-

बालभारतीच्या पहिल्याच्या पुस्तकात काय?
बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकात सध्या पान क्रमांक 66 वर मुळाक्षरे या धड्यात मध्ये ऍ आणि ऑ चा समावेश नाही असेच दिसते आहे. तसेच पान क्रमांक 67 वर बाराखडी असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. हे पुस्तक बालभारतीच्या संकेतस्थळावर ई पुस्तकामध्ये उपलब्ध आहे.

शासन निर्णय कधीचा व काय सांगतो?
सामान्य प्रशासन विभागाने 6 नोव्हेंबर 2009 रोजी शासन निर्णय काढला असून त्यामध्ये वर्णमाला अद्यायावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व विद्यापीठांना, प्राधिकरणांना ही नव्याने समाविष्ट झालेले स्वर, व्यंजने या बदललेल्या मराठी वर्णमालेचा स्वीकार करावा असे सांगितले आहे. मात्र तरीही इयत्ता पहिल्याच्या पुस्तकात आजही शासनाला हा बदल करता आलेला नाही.

ऍ आणि ऑ या स्वरोच्चारांचा वापर करण्याबाबतचा शासन निर्णय 2009 चा असून आम्ही त्याप्रमाणे पुस्तकात बदल केलेला आहे. आमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये ऍ व ऑ या स्वरोच्चारांची माहिती देण्यात आलेली आहे.
डॉ.सुनील मगर, संचालक
विद्या प्राधिकरण व बालभारती

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)