बालभारतीमधील धड्यांना विकिपिडियाच्या “लिंक्‍स’

माहिती समितीकडून तपासून घेणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्‍वासन

श्रध्दा कोळेकर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – जी माहिती दर मिनिटाला जगाच्या पाठीवर कुठूनही कोणीही सतत बदलू शकते अशा विकिपिडियावरील माहितीचा बालभारतीच्या ई-साहित्यात उपयोग करण्यात आला आहे. मात्र अशी माहिती विद्यार्थ्यांना देणे योग्य आहे का, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विचारले असता ती माहिती आमची समिती तपासेल असे वक्‍तव्य शिक्षणमंत्री तावडे यांनी केले. यामुळे बालभारतीच्या ई-साहित्यावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिंन्ह निर्माण झाले आहे.

धड्यांना जी विकिपिडियाची लिंक दिली आहे ती माहिती आमच्या समितीकडून तपासली जाईल.
– विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

यंदाच्या वर्षी इयत्ता पहिली, आठवी व दहावीची पुस्तके नव्याने आली आहे. यातील ई-साहित्याला “दिक्षा’ ऍपचा कोड दिला आहे. या पुस्तकांमधील “क्‍यू आर’ कोड स्कॅन केला असता लिंक थेट “दिक्षा’ ऍपकडे जाते. मात्र त्यापूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकांना मात्र थेट विकिपिडिया व युट्यूबच्या लिंक दिलेल्या पहायला मिळतात.
इयत्ता सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील पान दोनवरील “क्‍यू आर’ कोड स्कॅन केला असता पुस्तकाची अनुक्रमनिका दिसते. त्या अनुक्रमनिकेतील एकाएका धड्याच्या नावावर क्‍लिक केले असता काही लिंक्‍स या युट्यूबकडे जातात; तर सुधा मुर्ती यांच्यावरील “सलाम नमस्ते’ या धड्याची लिंक तुम्हाला थेट विकिपिडियावर घेऊन जाते. जिथे सुधा मूर्तीविषयी माहिती देण्यात आली आहे.
इयत्ता नववीच्या कुमारभारती पुस्तकावरील “क्‍यू आर’ कोडवर जाता काही धड्यांची नावे दिसतात. त्यामध्ये हसरे दु:ख, विश्‍वकोश, ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ, अभियंत्यांचे दैवत या धड्यांच्या लिंकवर क्‍लिक केले असता या लिंकही थेट विकिपिडियावर जातात.

दुरुस्त्यांसाठी समिती बसवू
इंटरनेटवरील माहितीबाबत तावडे यांनी स्वत:च्या मुलीचं व त्यांचे उदाहरण दिले. मुलगी गुगल मॅपचा उपयोग करून दूरचा रस्ता सांगत होती तर दुसरा पर्यायी रस्ता मला माहिती होता. त्यामुळे इंटरनेट प्रत्येकवेळी बरोबर असेलच असे नाही हे सांगताना ते म्हणाले, “यातील अशा छोट्या मोठ्या दुरुस्त्यांसाठी आपण समिती बसवू जी या साहित्याची तपासणी करेल.’ मात्र ई-साहित्य जाहीर करण्यापूर्वी ही तपासणी का झाली नाही असाही प्रश्‍न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)