पुणे,दि.26 – बालभारतीकडून आता पुस्तकांचे कॉपीराईट्‌स (स्वामित्त्व हक्‍क) घेण्यात येणार असल्याने आता बाजारात बालभारतीच्या पुस्तकांवर आधारित असलेल्या गाईड्‌सही आता बालभारतीच्या परवान्यानंतर बाजारात येणार आहेत. यासाठी बालभारतीने परवान्यांचे सविस्तर धोरण जाहीर केले आहे.
बालभारती पुस्तकांचे कॉपीराईट घेणार ही बाब आतापर्यंत सर्वश्रृत होती मात्र आता गाईड्‌सही परवाने घेऊन बाजारात येणार ही बाब नव्याने समोर आली आहे. त्यानुसार पुस्तकांवर आधारित गाईड्‌सचे प्रकाशन करणाऱ्या प्रत्येक प्रकाशकाला प्रत्येक माध्यमाच्या प्रत्येक पुस्तकासाठी दरवर्षी 63 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. तर प्रश्‍नावली म्हणजेच वर्कबुकसाठी 31 हजार रुपये व डिजिटल साहित्यासाठी 35 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी प्रकाशकांना दरवर्षी या परवान्याचे नुतनीकरण करावे लागणार आहे. ज्या प्रकाशकांची उलाढाल 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशांना हे शुल्क भरावे लागणार नाही. बालभारतीने पुस्तक प्रकाशित केल्यापासून एक महिन्याच्या आत प्रकाशकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करावे लागेल. परवागीशिवाय साहित्य निर्मिती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई तर होईलच परंतु त्यांना तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल. शाळेतील शिक्षकांना मात्र यातून सूट दिली असून पुस्तकांवर आधारित साहित्याची निर्मिती ते करु शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)