बालचमूंनी बनविले आकर्षक किल्ले

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील बालचमूंनी दिवाळीनिमित्त किल्ले बनविले आहेत. कळंब परिसरातील नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, साकोरे, चास, महाळुंगे, एकलहरे, चांडोली, लौकी इत्यादी गावांतील शाळकरी मुलांनी दिवाळी सणानिमित्त आकर्षक किल्ले बनवून किल्ल्यांवर राजा शिवछत्रपतीची प्रतिकृती, सैनिक, मावळे, रांगोळी काढून तसेच किल्ल्याजवळ पणत्या लावून आकर्षक सजावट केली आहे. कळंब येथील निरंजन युवराज कानडे, नारायणी युवराज कानडे, युगंधर रमेश कानडे या भावंडांनी किल्ल्याची प्रतिकृती आपल्या घराभोवती उभारली आहे. शाळकरी मुले दिवाळीच्या सुट्टीमध्ये लाल माती, विटा आदि साहित्यांपासून मोठे आकर्षक किल्ले बनविले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)