बालगोपालाच्या कलाविष्काराने जिंकले मने

खालुंब्रेतील श्री समर्थ स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

चिंबळी- आम्ही ठाकर ठाकर, उभ्या रानातील पाखर’, “झिंग झिंग झिंगाट’, “देवा श्री गणेशा… या हिंदी-मराठीचित्रपटातील गीतांचा तसेच देशभक्‍तीपर गीत या नृत्याला बालगोपालच्या गीतांना व नृत्याला पालक वर्गाने व मान्यवरांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.तर विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने सर्व पालक व सन्मानीय पाहुणे मंत्रमुग्ध झाले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कारटी प्रात्यक्षिकांसह सामाजिक व विनोदी नाटिकांने पालकांची व मान्यवरांची मने जिंकले. निमित्त होते श्री समर्थ शिक्षण प्रसाक मंडळाच्या खालुंब्रे (ता. खेड) येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे तिसऱ्या वार्षिक स्नेहसंमेलाचे.
या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ श्री समर्थ शिक्षण प्रसाक मंडळ, मोईचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी हवेली तालुका पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, विनोद मंहाळुकर, सुनिल शेळके, स्कुलच्या प्राचार्य अनिता टिळेकर, कोमल फलके, सपना टाकळकर, ललिता बडदे, विद्या पवार, अमोल गवारे, विष्णू भर्दे, सरपंच संजय पवार, उपसरपंच अनिता बोत्रे, अध्यक्ष दत्तात्रय बोत्रे आदि मान्यवरांसह आजी-माजी पदाधिकारी, नागरिक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्य कलाविष्काराला श्रोत्यांनीही ठेका धरत साथ दिली. तर नृत्य, गाण्याला उपस्थितांकडून दाद तर मिळत होती शिवाय बक्षिसांचा वर्षावही होत होता.

  • शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे आपल्या वेगवेगळ्या लोककला जपणारे आणि त्यातून आपली संस्कृती मुलांना पटवून देणारे एक व्यासपीठ असते. विविध लोककला, कोळीगीते, भांगडा, कथ्थक या सगळ्या नृत्यप्रकारांचा समावेश स्नेहसंमेलनचा एक भाग असतो. प्रत्येक शाळेची व त्यातील शिक्षकांची ही जबाबदारी असते की आपल्या मुलांना चांगल्यातून उत्कृष्ट कसे देता येईल आणि मुलांचे हित कसे साधता येईल हे पाहणे. त्यामुळे शालेय जीवनातील स्नेहसंमेलना अधिक महत्त्व आहे.
    – शिवजी गवारे, संस्थापक अध्यक्ष श्री समर्थ शिक्षण प्रसाक मंडळ, मोइ
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)