बालगृहातील 15 मुलांना अतिसाराची लागण

कराड, दि. 28 (प्रतिनिधी) : येथील बालगृह(रिमांड होम) मधील पंधरा मुलांना अतिसारासह उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याते रूग्णालयाकडून सांगण्यात आले.
बालगृहात 93 मुले असून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी रिमांड होममधील व्यवस्थापनाकडे आहे. या मुलांना नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव समाजातील देणगीदारांकडून जेवण दिले जाते. दरम्यान, शनिवारी रात्रीपासून पंधरा मुलांना अतिसाराचा त्रास होऊ लागल्याचे देखरेख करणारयांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मुलांना उपजिल्हा रूग्णालयात हलवले. मात्र, त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने कृष्णा रूग्णालयात हलवले. पंधराही मुलांवर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा रूग्णालयाशी संपर्क साधला असता मुलांना जड अन्न खाल्ल्याने हा त्रास होऊ लागला असावा, अशी शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली. आत्ता मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे सांगण्यात आले. बालगृहातील प्रभारी अधिकारी संकपाळ यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, मुलांना दोन दिवसांपुर्वी त्रास होऊ लागल्याने खबरदारी घेत रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली आहे. मुले आता चांगली असून त्यांना होणारा त्रासही कमी झाला आहे. रक्षाबंधनच्या काळात बाहेरील पदार्थ, पेढे खाल्ल्याने हा त्रास झाला असावा, अशी शक्‍यता त्यांनी वर्तवली असून उर्वरीत मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तातडीचा वैद्यकीय तपासणी कॅम्प बुधवारी घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)