‘बालगंधर्व’चे होणार पुनर्विकास !

महापालिका प्रशासनाने मागविले प्रस्ताव ; 21 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात जाहीर केल्यानुसार, बालगंधर्व रंगमंदिरांच्या पुनर्विकासासाठी महापालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अंतर्गत प्रशासनाने नोंदणीकृत वस्तू विशारदांकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्या; मुळे रंगमंदिराचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, या प्रस्तावास नाट्य कलाकार तसेच नाट्य रसिकांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. या योजनेसाठी 2018- 19 च्या अंदाजपत्रकात 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

असा आहे प्रशासनाचा प्रस्ताव

पुणे महानगरपालिकेतर्फ सदर परिसराचे नवीन विकास योजनेतील तरतुदीनुसार काळानुरूप पुनर्निर्माण करण्याचे नियोजन आहे.कलापरिषद, नवी दिल्लीमध्ये नोंदणीकृत वास्तुविशारदांकडून सदर प्रकल्पासाठी प्रस्ताव देण्यास आमंत्रित केले आहे. नियोजित प्रस्ताव हा परिसराच्या भविष्याचा विचार करतानाच त्याच्या सांस्कृतिक संवर्धनाचा देखील ताळमेळ साधणारा असा सर्वंकष असणे अपेक्षित आहे.

अ) रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्याठिकाणी नव्याने प्रचलित डी.सी. रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत बांधणे,

ब) सध्याची इमारत कायम ठेवून सध्याच्या अस्तित्वातील नाट्यगृहाचे इमारतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थानेि परिपूर्ण अशा पद्धतीच्या रंगमंदिराचा प्रकल्प उभारणकामी डिझाईन सादर करणे.

असा आहे नाट्यगृहाचा थोडक्यात इतिहास

रंगमंदिर हे पुण्यातील सांस्कृतिक चळवळीचे मुख्य केंद्र आहे. त्याचे उद्घाटन २६ जून १९६८ रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होतेसदर रंगमंदिर परिसराचे नियोजन त्या काळातील सांस्कृतिक जगतातील पु.ल. देशपांडे आदी दिग्गजांच्या सूचनेनुसार करण्यात आले होते रंगमंदिरास संगीत नाटकांचा दैदीप्यमान काळ गाजवणारे बालगंधर्व यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच रंगमंदिराचे भूमिपूजन  ८ ऑक्टोबर १९६२ रोजी बालगंधर्व यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. रंगमंदिराची आसन क्षमता ९८९ असून त्याशिवाय इमारतीत ससज्ज असे कलादालन अस्तित्वात आहेरंगमंदिराच्या परिसरातील उपाहारगृह व मोकळी जागा रंगमंदिरास भेट देणाऱ्या बरोबर सर्वसामान्यांसाठी विरंगुळ्याचे तसेच वैचारिक देवाणघेवाणीचे ठिकाण आहे.

 

पुणेकर तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मते जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. हे प्रस्ताव मागविण्यात आले असले, तरी ते आल्यानंतर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती.

बालगंधर्व रंगमंदिर परिसराचा वेगाने होत असलेला बदल लक्षात घेऊनच हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचे प्रस्ताव आल्यानंतर सर्व घटकांशी चर्चा करून, तसेच पुणेकरांचा कल लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल.
– मुक्ता टिळक, महापौर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
4 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)