बालकुमार साहित्य संमेलनाचे सूप वाजले

शेवगाव – आज दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पाठपुस्तकातील कवी व साहित्यिक यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या तोंडून पाठ्यपुस्तकातील त्यांच्याच कविता ऐकल्या.
शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात दहावीच्या पुस्तकात “मल्हारची धून’ ही कविता असणाऱ्या कवयित्री डॉ. संगीता बर्वे, सातवीच्या सुलभ भारतीमध्ये “नाते जगाशी’ ही कविता असणाऱ्या कवयित्री आश्‍लेषा महाजन, सातवीच्या पुस्तकात “माणूसपण गारठलंय’ ही कविता असणारे कवी प्रा. शशिकांत शिंदे, तिसरीच्या सुलभ भारतीमध्ये “झोका’ ही कविता असणारे कवी दादासाहेब कोते, नववीच्या पुस्तकात “वनवासी’ ही कविता असणारे तुकाराम धांडे, चौथीच्या बालभारतीमध्ये “मला शिकायचंय’ हा धडा असलेले लेखक आबा महाजन, सातवीच्या पुस्तकात “स्वप्न विकणारा माणूस’ हा धडा असणारे लेखक अशोक कोतवाल, चौथी इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात “स्वयंपाक’ ही कविता असलेले कवी किशोर पाठक आणि प्रसिद्ध कवी दासू वैद्य या सर्व लेखक, कवींनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत आपल्या कविताही सादर केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)