बालकांना मिळणार बेबी केअर कीट

नगर: प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या बालकांना मोफत बेबी केअर कीट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आरोग्य केंद्रात जन्म घेणाऱ्या बालकांना दोन हजार रुपये किमतीचे साहित्य असलेली बेबी केअर कीट पुरवण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी येत्या 26 जानेवारीपासून करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

बालमृत्यू रोखण्यासाठी विकसित देश विविध उपाययोजना करत असतात. यामध्ये बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाते. देशातील आंध्र प्रदेश, तमिळनाडू व तेलंगणा ही राज्ये नवजात बालकांना बेबी केअर कीट देत आहेत. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात या राज्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले आहे. त्यामुळे राज्यातही ही योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेत पहिल्या प्रसुती वेळी सरकारी रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या महिलेने अंगणवाडी केंद्रात अर्ज दिल्यास बेबी केअर कीट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये नवजात बालकांना उपयोगी साहित्य आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांमार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. कीट खरेदी आयुक्तांकडून केली जाणार आहे. त्यानंतर या कीट जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच ग्रामीण भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिल्या जाणार आहेत. राज्यात या योजनेची अंमलबजावणी येत्या 26 जानेवारीपासून केली जाणार आहे. या योजनेसाठी शंभर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागाचे सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत आरोग्य विभागाचे सचिव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त, कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त, कोणत्याही दोन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच दोन जिल्हा परिषदांचे सीईओ व महिला बालविकास अधिकारी सदस्य असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)