पुणे – नवजात बाळांना स्तनपान देण्याची योग्य पद्धत कोणती, बाळ काही महिन्यांचे झाल्यावर त्याचा पहिला आहार कसा असावा, बाळांच्या सर्वांगीण पोषणासाठी काय महत्त्वाचे, असे अनेक प्रश्‍न बालकांच्या पालकांना पडतात. या प्रश्‍नांची उत्तरे आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळवता येणार आहेत. ओएनपी ट्यूलिप रुग्णालयाच्या वतीने बालकांच्या मातांसाठी विनामूल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले असून अगदी नवजात बाळापासून मूल 1 वर्षाचे होईपर्यंत बाळांचे पोषण कसे असावे, असा या सत्राचा विषय आहे. रुग्णालयाच्या संचालिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस यांनी ही माहिती दिली. सेनापती बापट रस्त्यावरील गोखलेनगर येथे असलेल्या ओएनपी ट्यूलिप रुग्णालयात शनिवारी (दि.1 सप्टेंबर) दुपारी 4 वाजता या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)