बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या – जगदाळे

नीरा नरसिंहपुर- गोंदी (ता. इंदापूर) येथील अंगणवाडीतील रंगरंगोटी केलेला शाळेची वर्ग पाहून पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षक सेविकांचे अभिनंदन करून बालकांना चांगले दर्जाचे शिक्षण देताना त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, अशीही सूचना केली. यावेळी त्यांनी शिक्षकांकडून अभ्यासक्रमही जाणून घेतला. यावेळी गोंदी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक जगताप, गोविंद पाटील, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अन्य अडचणी तसेच मागण्याही जगदाळे यांच्याकडे केल्या. यावर योग्य ते उपाय शोधू, कामे पूर्ण करू, असे आश्‍वासन जगदाळे यांनी दिले. सूत्रसंचालन किरण खटके यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)