बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना आता मृत्युदंडाची शिक्षा

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉक्सो कायद्यातील बदलालाही मंजुरी देण्यात आली आहे. देशात बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्याला आळा घालण्यासाठी बाललैंगिक शोषण केल्यास मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याच्या पॉक्सो कायद्यातील दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्याबाबतची माहिती दिली.

या कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी मी आणि माझे मंत्रालय पॉक्सो कायद्यात बदल करणार आहे, त्यानुसार 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असेल” असे मेनका गांधी कठुआ प्रकारणांनंतर म्हणाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)