बालआनंद मेळाव्यात नांदूरशिकारी शाळेचे सुयश

भावीनिमगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गट अंतर्गत राबविण्यात आलेल्या नेवासा तालुक्‍यातील कुकाणा गटाचा बालआनंद मेळावा गणातील गेवराई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडला. गटातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या बाललीलांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांना मोहित केले.
या कार्यक्रमामध्ये नांदूरशिकारी शाळेने विविध प्रकारच्या नाटिका, रांगोळी, समूहगीत, खाद्य दालन व संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन लक्षवेधक यश मिळवले. रांगोळी स्पर्धेत प्रणिता लिपणे हिने लहान गटात प्रथम, चित्रप्रदर्शन लहान गटात प्रतीक्षा लिपणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या गटात शाळेच्या “जय हो’ या समूहगीत नृत्याने उपस्थितांना तालबद्ध ठेका धरायला लावला. खाद्य दालनामध्ये नांदूरशिकारी शाळेच्या प्रशांत लिपणे व हनुमान बेडके यांच्या “पाणीपुरी’ स्टॉलने धमाल केली.
तर, खवय्येगिरीत सर्वात जास्त पसंतीस उतरला तो योगिता शिरसाठ, निकिता लिपणे, सीमा खलाटे, अर्चना पवार, सोनाली पवार, मयूरी तरटे, ऋतुजा गवारे, अश्‍विनी गायकवाड, निकिता खलाटे, ज्ञानेश्‍वरी गुंड, ऊर्मिला धुमाळ यांच्या चटकदार भेळ या स्टॉलने सर्व पाहुण्यांना मोहिनी घातली. जि.प.चे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जि. प. सदस्या डॉ. तेजश्री लंघे, पं. स. उपसभापती राजनंदिनी मंडलिक, पं. स. सदस्या सुषमा खरे, गटशिक्षणाधिकारी विलास साठे या सर्वांनी या भेळीचा आस्वाद घेऊन मुलींचे विशेष कौतुक केले.
बालआनंद मेळाव्यात नांदूरशिकारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच शशिकला राजमाने, उपसरपंच गोरक्षनाथ लिपणे, सेवा सोसायटी अध्यक्ष ज्ञानदेव मुरकुटे, उपाध्यक्ष आसाराम लिपणे, माजी सरपंच सतीश कर्डिले, तंटामुक्ती अध्यक्ष रखमाजी लिपणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्‍वनाथ लिपणे यांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय घुले, सुनीता पाचेगावकर, पंढरीनाथ काशिद, लक्ष्मण गायकवाड, नामदेव धायतडक, अंबादास बोरुडे, आशा माने, गोपाळ राऊत, क्रीडाशिक्षक अंकुश नवले, कलाशिक्षक रवींद्र पवार, कार्यानुभव शिक्षक सचिन लिपणे यांचे मार्गदर्शन लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)