बालआनंद मेळाव्यातून मुलांना व्यवहारज्ञान मिळते…

तेजश्री लंघे : कुकाणा जिल्हा परिषद गटातील शाळांचा गेवराईत बालआनंद मेळावा

गोपाळपूर – “”जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित केलेल्या बालआनंद मेळाव्यामागे मुलांचे खूप कष्ट असतात. अशा बालआनंद मेळाव्यातून पालकांचे समाधान होते. मुलांचे हे शिक्षणाचे वय असते. या वयात मुलांना जास्त कशामध्ये रस आहे ते पालकांनी पाहिले पाहिजे. त्यांना त्याच क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. असा बालआनंद मेळावा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. यामधून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळते,” असे प्रतिपादन जि. प. सदस्या डॉ. तेजश्री लंघे यांनी केले.

नेवासा तालुक्‍यातील कुकाणा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा बालआनंद मेळावा गुरुवारी गेवराई जिल्हा परिषद शाळेमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती राजनंदिनी मंडलिक होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, पंचायत समिती सदस्या सुषमा खरे, सोपानराव कर्डिले, गवराईचे सरपंच अशोक शिंगारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
लंघे म्हणाल्या की, एका निकिताची जर इस्त्रो सहलीसाठी निवड होत असेल तर या जिल्हा परिषद शाळांमधून अनेक निकिता तयार होतील व मुलांपेक्षाही जास्त नावलौकिक प्राप्त करून देतील. माझ्या वडिलांच्या काळामध्ये कुकाणा गटामध्ये अनेक कामे झाली आहेत. यापुढेही आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामे मार्गी लावणार आहे. गेवराई येथील अंगणवाडीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विठ्ठलराव लंघे म्हणाले, “”भविष्यातील मोठमोठ्या व्यक्ती या मुलांमध्ये दडलेल्या आहेत. मुलांनी स्पर्धेत भाग घेतला तर भविष्य घडू शकते. बालआनंद मेळाव्यामुळे मुलांच्या हुशारीची चुणूक पहायला मिळाली.” मुलांच्या भविष्याचा पाया असलेल्या शिक्षकांचे त्यांनी विशेष आभार मानले.
वरखेडचे सरपंच राजाबापू गोरे, वाकडीचे सरपंच भाऊसाहेब भगत, गेवराईचे उपसरपंच प्रकाश धनवटे, कुकाणा केंद्रप्रमुख नवनाथ फाटके, गेवराई केंद्रप्रमुख भाऊसाहेब जगताप, शिरसगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख जालिंदर गोरे, गेवराई शाळेचे मुख्याध्यापक कैलास धानापुने, बाबासाहेब कर्डिले, बाबासाहेब आदमने, नीलेश कर्डिले, नाना आदमने, शंकरराव खाटीक, भाऊसाहेब बर्वे, महादेव काळे, पांडुरंग काळे, विनायक कर्डिले, सुभाष कर्डिले, शिवाजी गुंजाळ, शिक्षक संजय खरे, भास्कर खरे, नामदेव शिरसाठ, संजय आगळे, दीपक सरोदे, रामेश्‍वर शिंदे, बापूसाहेब सोनवणे, विठ्ठल काळे, ग्रामसेवक दिगंबर चौधर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक रमेश राऊत यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक सुरेश सानप व शिक्षिका बडे यांनी केले व शेवटी शिक्षक किशोर गव्हाणे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)