बालआनंद मेळावे स्तुत्य उपक्रम – दंडवते

कोपरगाव – “”प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कला, गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बालआनंद मेळावे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांनी केले.

तालुक्‍यातील चासनळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित बालआनंद मेळाव्याचे उद्‌घाटन दंडवतेंच्या हस्ते झाले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. उपस्थितांनी खाद्यपदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजनही करण्यात आले होते. दंडवते यांच्या हस्ते कलादालनाचे उद्‌घाटन करण्यात आले. रांगोळी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.
पंचायत समिती सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य विमल आगवण, कारभारी आगवण, पंडित चांदगुडे, पंचायत समिती सदस्या पौर्णिमा जगधने, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख इंगळे, कडवे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाघमारे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)