बार कौन्सिल निवडणुकीसाठी जिल्ह्यातून 61 टक्के मतदान

मतदान असल्याने शहरासह उपनगरांतील अनेक वकील न्यायालयात आले होते. तसेच, उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी अनेक ज्युनिअर वकीलही जातीने कार्टात हजर होते. मतदानासाठी पुणे बार व जिल्ह्यातील सर्व बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली. दिलेल्या कालावधीत शांततेत निवडणूक झाली.

– ऍड. सुभाष पवार, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

 

पुणे : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीसाठी बुधवारी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातून या निवडणुकीसाठी 61 टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील 12 हजार 509 वकिलांपैकी 7 हजार 635 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान चार बुथ मतदान प्रक्रिया झाली. दुपारी 1 पर्यंत केवळ 30 टक्के मतदान झाले होते. मात्र, दुपारी तीननंतर मोठ्या प्रमाणात वकील मतदानासाठी दाखल झाले होते. त्यामुळे लाईन लावून मतदान करावे लागले.

दरम्यान, निवडणुकांसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व बाबींची खबरदारी न घेण्यात आल्याने काही ठिकाणी तुरळक गोंधळ झाला; तर निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे कर्मचारी व यंत्रणा देण्यात आली नसल्याची नाराजी काही उमेदवरांनी व्यक्त केली.

उमेदवारांची माहिती देण्यासाठी कोर्टात ठिकठिकाणी टेबल मांडण्यात आले होते. या सर्वांमुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या निवडणुकीत 25 जागांसाठी राज्यातून 164 उमेदवार रिंगणात होते. त्यातील 23 उमेदवार पुण्यातील आहेत. महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांसह दादर-नगर हवेली आणि दिव-दमण या दोन केंद्रशासीत प्रदेशात ही निवडणूक झाली. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्‍याच्या ठिकाणी मतदानाची सोय करण्यात आली होती. पुण्यात शिवाजीनगर, बारामती, भोर, दौंड, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, जुन्नर, राजगुरूनगर, सासवड, वडगाव मावळ, पिंपरी येथे मतदानाची केंद्रे देण्यात आली होती. या सर्व ठिकाणी शांततेत मतदान झाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)