बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाची आज निवडणूक

पुणे- राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची निवडणूक आज (बुधवार) होणार आहे. तब्बल आठ वर्षांच्या कालावधीनंतर लागलेल्या या निवडणूकीबाबत वकिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मतदान करणार आहेत.

निवडणूकीत 25 जागांसाठी राज्यातून एकूण 164 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील उमेदवार पुण्यातील आहे. महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांसह दादर नगर हवेली आणि दिव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशात ही निवडणूक पार पडेल. या सर्व ठिकाणांतून सुमारे 1 लाख 22 हजार 244 वकील मतदान करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सुमारे 14 हजार 398 वकील मतदार आहेत. त्यापैकी सुमारे साडेअकरा हजार वकील पुणे शहरातील आहेत.

तर उर्वरित आकडा हा जिल्ह्यातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्‍याच्या ठिकाणी मतदानाची सोय करण्यात आली आहे. पुण्यात शिवाजीनगर, बारामती, भोर, दौंड, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, जुन्नर, राजगुरूनगर, सासवड, वडगाव मावळ, पिंपरी येथे मतदानाची केंद्रे आहेत.

पदवीधर मतदार संघाप्रमाणे पसंती क्रमांक लिहून या निवडणुकीसाठी मतदान करावे लागते. मतदात्याला किमान पाच आणि कमाल 25 मते देता येतात. त्यापेक्षा कमी अथवा जास्त मते टाकल्यास ती मतपत्रीका अवैध ठरविण्यात येते. तसेच पसंतीचे 1 ते 5 आकडे लिहणे आवश्‍यक आहे. एखादा आकडा विसरल्यास अथवा न लिहल्यास ते मतही बाद ठरते.
यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. नागपूरच्या यादीत त्यांचे नाव आहे.

यंदाच्या निवडणुकीत सुमारे टक्के मतदार हे नवोदीत आहेत. त्यामुळे त्यांची पंसती कोणाला असेल यावर निकाल अवलंबून असेल. गेल्या निवडणूकीत जिल्हातून उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी एकाने बार कौन्सिलचे अध्यक्ष पदही भूषविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)