बार्सिलोनाच्या विजयात नवोदित खेळाडू चमकले

बार्सेलोना: स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत कोपा देल रे स्पर्धेचा सामना खेळणाऱ्या बार्सेलोना संघाने कल्चरल लेओनेस संघाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात बार्सेलोनाच्या संघाच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंनी वरिष्ठ खळाडूंची कमतरता भासू दिली नाही. डेनीस सुवारेज दोन गोल, मुनीर एल हदादी आणि मालकोम यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. तर लेओनेसा संघासाठी एकमात्र गोल जोसेप सेने याने नोंदवला.

स्पॅनिश किंग्स कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपा देल रे स्पर्धेत सलग चार वेळा विक्रमी विजेतेपद मिळविणाऱ्या बार्सेलोना संघाने संघात मोठे बदल करून जास्तीत जास्त नवोदित खेळाडूंना संधी दिली होती. घरच्या मैदानावर खेळताना सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत प्रथम बार्सेलोनाने 18 व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. पहिले सत्र संपले तेव्हा मुनीर, डी. सुवारेज आणि मालकोम यांच्या प्रत्येकी एक गोलाच्या बळावर बार्सेलोना संघाकडे 3-0 अशी आघाडी होती. दुसऱया सत्राच्या सुरुवातीला लिओनेसा संघाने गोल केला. परंतु, नंतर त्यांचा संघ चमक दाखवू शकला नाही. 70 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत सुवारेजने बार्सेलोना संघाचा विजय पक्का केला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)