बारा वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

पिंपरी – कासारवाडीमध्ये बारा वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.

यश अमित मुळीक (वय-12, रा. कासारवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा कासारवाडी येथील विद्यार्थी विकास शाळेमध्ये सहावीच्या वर्गात शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने तो दिवसभर घरातच होता. दुपारी वडील कामावर गेले असताना त्याने टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.

खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याने शेजारील एका तरुणाने दाराच्या फटीतून डोकावले. यावेळी यशने आत्महत्या केल्याचे उघड झाले. यशला गुन्हेविषयक मालिका पाहण्याचा छंद होता. तसेच तो सतत मोबाईल देखील वापरत होता. आत्महत्येचे नेमके अद्याप समजू शकले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)