बारा लाखाच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

वडगाव मावळ – कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देवून तीन वर्षात 12 लाख 53 हजार रुपयांची खंडणी घेतली. तसेच, त्यानंतर 1 लाख 73 हजारांचा धनादेश जबरदस्तीने लिहून घेतला. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत आत्माराम शेंडगे (वय-30) आणि नीलेश बाळासाहेब भेगडे (वय-35, दोघे रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. नवनाथ धोंडीबा म्हसे यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेंडगे आणि भेगडे यांनी फिर्यादी नवनाथ म्हसे यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. 27 जून 2014 ते 28 जून 2017 या कालावधीत तीन वर्ष बळजबरीने 12 लाख 53 हजारांची खंडणी घेतली. आरोपींनी घेतलेली इनोव्हा मोटार परत केली असता, पुन्हा जीवे मारण्याची धमकी देवून 1 लाख 73 हजार 500 रुपयांचे तळेगाव दाभाडे सिंडिकेट बॅंकेचे धनादेश लिहून घेतला. या प्रकरणी पोलिसांनी शेंडगे आणि भेगडे याला अटक केली आहे. त्यापैकी भेगडे याला गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सोमवारपर्यंत (दि. 17) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर तपास करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)