बारा लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी – हिंजवडी पोलिसांनी तब्बल 11 लाख 75 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई हिंजवडी मधील पुणे-मुंबई महामार्गावर वाकड पुलाखाली केली.

दर्शन दत्तात्रय तुरेकर (वय-30), पंकज दत्तात्रय तुरेकर (वय-27, दोघे रा. मगरआळी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे गस्त घालत असताना पोलीस नाईक कुणाल शिंदे यांना माहिती मिळाली की, मुंबई येथून एक 407 टेम्पो गुटखा घेऊन देहूरोड कात्रज बायपासने जाणार आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी वाकड पुलाखाली सापळा रचून एक टेम्पो (एमएच 12, जेएफ 2829) आणि एक पीकअप (एमएच 12, एनएक्‍स 7895) या दोन वाहनांना थांबवून त्यांची झडती घेण्यात आली. टेम्पोमध्ये 11 लाख 75 हजार रुपये किंमतीचा विमल मसाला गुटखा आढळून आला. पोलिसांनी एक टेम्पो एक पीकअप आणि गुटखा असा एकूण 24 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, पोलीस कर्मचारी किरण पवार, अतिक शेख, कुणाल शिंदे, विकी कदम, श्रीकांत कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)