बारा अट्टल सराईंतांवर मोक्‍का

लोणावळा – पुणे, अहमदनगर व खानदेशात दहशतीचे वातावरण पसरविणाऱ्या बारा अट्टल सराईत गुन्हेगारांवर मोक्‍कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण व शहर परिसरात अनेक ठिकाणी खून, खुनाचे प्रयत्न, दरोडे, दरोड्याचे प्रयत्न, जबरी चोऱ्या, बेकायदा शस्त्र बाळगणे, गर्दी जमवून हाणामाऱ्या, व अपहरण अशाप्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे सराईत संघटितपणे करत होते. अहमदनगर मधील कोपरगाव येथील अट्टल गुन्हेगारांच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत.

पोलिसांनी 12 संघटित गुन्हेगारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 कायद्यान्वये मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारांसह इतर गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांचे धाबे दणाणले आहे.

शाहरुख रज्जाक शेख, शाहेद खान जाहेरखान पठाण, इब्राम रुस्तुम शेख, विकास जालिंदर मुळे, फारुख दिलवार पिंजारी, सुलतान अयुब पठाण, तन्वीर मोहम्मद हनीफ रंगरेज, संदीप उर्फ खुकार विजय वाघमारे, बंटी उर्फ सागर सोना पगारे, महमंद मौलाना, पट्यार उर्फ विजय लक्ष्मण इस्टे व विवेक बाळासाहेब परदेशी (सर्व रा. कोपरगाव, अहमदनगर) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सराईतांनी आठ सप्टेंबर 2017 रोजी जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका व वाकसाई गावच्या हद्दीतील अरुणोदय ढाब्याजवळ मोठी लूट केली होती. मध्यरात्री एका कंटेनर चालकाला अडवून त्याचे हातपाय बांधून सुमारे दोन कोटी रुपयांचा सिगारेटचा मुद्देमाल असलेला कंटेनर घेऊन पळवून नेला होता. याबाबाबत कंटेनरचालक कमाल अहमद शमी खान (वय-41, रा.धारावी, मुंबई) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, 8 ते 10 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील स्कॉर्पिओ गाडी कंटेनरला आडवी लावून कंटेनर थांबवला. कंटेनर चालकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याला लाथा बुक्कयांनी मारहाण करून त्याचे हातपाय बांधून सिगरेटने भरलेला कंटेनर घेऊन नाशिकला गेले होते. याप्रकरणाचा तपास पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या सूचनानुसार या प्रकरणाच्या तपासी अंमलदार साधना पाटील व त्यांच्या पोलीस पथकाने या प्रकरणाचा छडा लावला व या प्रकरणातील दरोडेखोरांना जेरबंद केले होते.

या सर्व गुन्हेगारांची सखोल चौकशी केली असता, संबंधितांच्या विरोधात शिर्डी, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, अहमदनगर, नारायणगाव, खान्देश या पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात खून, खुनाचे प्रयत्न, दरोडे, दरोड्याचे प्रयत्न, जबरी चोऱ्या, बेकायदा शस्त्र बाळगणे, गर्दी जमवून हाणामाऱ्या करणे व अपहरण करणे अशाप्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. यामुळे अशाप्रकारच्या अट्टल संघटित गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात पुरावे जमा करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 कायद्यान्वे मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. सदर गुन्हेगारांच्या विरोधात मोठयाप्रमाणात भरपूर पुरावे प्राप्त झाल्याने त्यांच्यावर दोषारोपपत्र पाठविण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी दिली. यामुळे संबधित गुन्हेगारांच्या विरोधात विशेष न्यायालय शिवाजीनगर, पुणे दोषारोपपत्र पाठविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)