बारावी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम

पुणे – स. प. महाविद्यालय आणि “डिजीभारती’ यांच्या वतीने बारावी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना बारावी इयत्तेची मार्गदर्शनपर व्याख्याने संगणक प्रणालीच्या माध्यमातून आपल्या मोबाईल अथवा कोणत्याही संगणकांवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र या विषयावर दि. 26 एप्रिल ते 25 जून या सुट्टीच्या कालावधीत पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ज्येष्ठ प्राध्यापकांची व्याख्याने आयोजित केली आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलवर उपलब्ध होतील, अशी माहिती स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि डिजीभारतीचे कार्यकारी संचालक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. ही व्याख्याने स. प. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर 19 एप्रिलपासून चित्रित केले जाणार आहे. प्रथम नोंदणी केलेल्या 150 विद्यार्थ्यांना ही व्याख्याने प्रत्यक्षात ऐकता येतील. दि. 26 एप्रिलपासून व्याख्याने उपलब्ध होतील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शुल्क 2 हजार 340 रुपये इतके आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)