बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा

कार्ला – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचता यावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मावळ व सुनिल शेळके फाऊंडेशनच्या वतीने मावळ तालुक्‍यातील विविध भागातून वाहतुकीची सोय करण्यात येत आहे.

कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कालेजच्या विद्यार्थ्यांना देखील पवनानगर येथील परीक्षा केंद्रावर वेळेत जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठान व फांऊडेशनच्या सभासदांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक शहाजी लाखे, भरत येवले, संतोष हुलावळे, बाबाजी हुलावळे, सागर हुलावळे, सचिन हुलावळे, दत्ता भानुसघरे, नंदू मोरे, संकेत मोरे यांच्यासह गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सुनिल शेळके फांऊडेशनचे सभासद उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)