बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पिंपरी – बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुपीनगरमध्ये उघडकीस आली.

शिल्पा कांबळे (वय-18, रा. रुपीनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. शिल्पाने यावर्षी बारावीची विज्ञान शाखेतून परीक्षा दिली आहे. तिचे आई-वडील बांधकाम मजूर आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ते दोघेही सकाळी कामावर गेले.

दरम्यान, शिल्पा घरी एकटीच होती. सायंकाळी आई-वडील कामावरून आले असता, घराचा दरवाजा आतून बंद होत. दारावर वारंवार थाप देऊनही दार उघडले जात नसल्याने, शिल्पाच्या वडिलांनी खिडकीतून बघितले असता शिल्पाने ओढणीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी निगडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)