पुणे – इयत्ता बारावीच्या जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस येत्या सोमवार (4 जून) पासून सुरुवात होणार आहे. दि.13 जूनपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. विलंब शुल्कासह दि. 14 ते 18 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडहाकडून करण्यात आले आहे. यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)