बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागला 22 टक्‍के

पुणे विभागाचा निकाल 20.77 टक्‍के; राज्यात लातूर विभाग अव्वल
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरीपरीक्षेचा राज्याचा निकाल 22.65 टक्‍के लागला आहे. तर, पुणे विभागाचा निकाल 20.77 टक्‍के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्‍केवारी घसरल्याचे आढळून आले आहे. राज्यात इयत्ता बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातून 1 लाख 02 हजार 160 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 23 हजार 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाल असून निकालाची टक्‍केवारी 22.65 इतकी आहे. मंडळाने शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धत्तीने निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून निकालाची प्रिंट घेता येणार आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल 25.89 टक्‍के लागला होता.
विभागनिहाय निकालात लातूर विभागाने बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल 31.48 टक्‍के लागला आहे. तर, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 19.27 टक्‍के लागला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी दि. 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी दि. 27 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

विभागनिहाय निकाल-
पुणे – 20.77
नागपूर- 25.51
औरंगाबाद- 28.50
मुंबई- 19.27
कोल्हापूर- 25.94
अमरावती- 21.44
नाशिक- 22.32
लातूर- 31.48
कोकण- 19.75

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)