बारावीच्या परीक्षेत कर्जत तालुक्‍यात मुलींची बाजी

खेड, – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचीच निकाल पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मोबाइलवर निकाल पाहू शकत असल्याने अनेकांनी नेटकॅफेऐवजी मोबाइलला पसंती दिली. या परीक्षेत बहुतांशी मुलींनीच बाजी मारल्याचे तालुक्‍यात चित्र पहावयास मिळाले.

कुळधरणच्या नूतन मराठी उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 96.47 टक्के, तर कला शाखेचा निकाल 88.23 टक्के लागला. विज्ञान शाखेत ज्ञानेश्वरी गौतम घालमे हिने 81.23 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. मनुजा बाळासाहेब गुंड (80.33) हिने द्वितीय, तर कोमल काशिनाथ वाघमारे (78.00) हिने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब गुंड, कार्याध्यक्ष महेंद्र गुंड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजूषा गुंड, प्राचार्य सूर्यभान सुद्रिक, पर्यवेक्षक भागवत घालमे तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिरजगावच्या नूतन ज्युनिअर कॉलेजचा शेकडा निकाल असा : विज्ञान – 100, वाणिज्य-100, कला- 73.84. विज्ञान शाखेत प्रथम – अमोल परसराम आजबे (82.46), द्वितीय- दिव्या रमेश काळे (80.92), तृतीय- आफताब मकसूद सय्यद (80.31), वाणिज्य शाखा – प्रथम- रसिका किशोर महामुनी (90.92), द्वितीय- पूनम अशोक मासाळकर (90.46), तृतीय- आकाश संजय पांडुळे (76.46), कला शाखा- प्रथम-सविता लाला गंगावणे (68.62), द्वितीय- शीतल शांतीलाल कोठे (68.31), तृतीय- प्रतिभा दादासाहेब सटाले (66.31). यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आजिनाथ चेडे, उपाध्यक्ष महेंद्र चेडे, सचिव प्रकाश चेडे, प्राचार्य बबनराव खराडे, उपप्राचार्य डॉ. नवनाथ टकले, पर्यवेक्षक जयंत चेडे तसेच सर्व सेवकांनी अभिनंदन केले.
तालुक्‍यातील इतर विद्यालयांचे सरासरी निकाल असे : दादा पाटील महाविद्यालय, कर्जत- 92.96, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, कर्जत- 99.15, जगदंबा विद्यालय, राशीन- 77.38, अमरनाथ उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत- 92.08, सिद्धेश्वर विद्यालय, भांबोरे- 90.90, डॉ. जी. डी. सप्तर्षी ज्युनिअर कॉलेज, खेड- 86.66, न्यू इंग्लिश, कोंभळी-93.75, धाकोजी महाराज विद्यालय, निमगाव डाकू- 53.33, समर्थ विद्यालय, कर्जत- 88.68, पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय, अंबिकानगर- 96.00, स्वानंद विद्यालय, चिंचोली-90.32, विठ्ठल विद्यालय, माहिजळगाव- 97.22, न्यू इंग्लिश स्कूल, आंबीजळगाव- 91.15, हशु अडवाणी कॉलेज, राशीन-84.53, आनंदराव फाळके पाटील कॉलेज, कर्जत-96.15, सद्‌गुरु कन्या विद्यालय, कर्जत-92.06, न्यू इंग्लिश स्कूल, कोरेगाव – 78.84.

खेडला मुलीच ठरल्या अव्वल…
खेडच्या डॉ. जी. डी. सप्तर्षी ज्युनिअर कॉलेजचा निकाल 86.66 टक्के लागला. प्रथम तीन क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली. पूजा दिलीप काळे हिने 84 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शुभांगी लक्ष्मण लष्करे (83.38) हिने द्वितीय, तर प्राजक्ता मोहन सायकर (78.92) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

संस्थेचे संस्थापक व माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, सचिव मकरंद सप्तर्षी, प्राचार्य चंद्रकांत मोरे, चंद्रकांत चेडे, हसन सय्यद, माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, महादेव भांडवलकर, संदीप भिसे, किरण जगताप तसेच सर्व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)