बारावीच्या निकालावर पुन्हा टांगती तलवार कायम

मुंबई – एकीकडे बारावीची परीक्षा सुरु असली, तरी बारावीचा निकाल वेळेत लागेल याची आताच शाश्वती देता येणार नाही. कारण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर पुन्हा टांगती तलवार कायम राहणार आहे.

येत्या 26 मार्च रोजी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिक्षक महसंघाने दिला आहे. पण तरीही शासनाने निर्णय न घेतल्यास तपासलेल्या उत्तर पत्रिका आणि मार्कशीट बोर्डात जमा न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याचा निकालावर परिणाम झाल्यास यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असेही संघटनेने म्हटले आहे. यापूर्वी 5 मार्चला शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता.

दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कारासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार असून, त्यांच्यामुळे शिक्षकांवर संप करण्याची वेळ आली आहे, असा घरचा आहेर भाजप समर्थित शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणे अपेक्षित आहे. पण शिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीचे 65 लाख पेपर तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे निकाल वेळेत लागेल का, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)