बारावी सीबीएसईचा निकाल, देशात मेघना श्रीवास्तव प्रथम

बारावीचा सीबीएसईचा निकाल जाहीर, पुण्यातील शाळांचे निकालही शतप्रतिशत

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नोइडाची मेघना श्रीवास्तव ही विद्यार्थिनी पहिली आली असून तिला 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. पुण्यातील शाळांमधील बहुतांशी शाळांचा निकाल यंदाही शंभर टक्‍के लागला आहे.

केंद्रीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेली इयत्ता बारावीची ही परीक्षा 5 मार्च ते 27 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. देशभरातील 11 हजार 510 शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्‍केवारी एका टक्‍क्‍याने वाढली आहे. तर मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मुलींचा निकाल हा मुलांच्या तुलनेत जवळपास नऊ टक्‍क्‍यांनी पुढे आहे. मंडळाच्या विभागांमध्ये त्रिवेंत्रम हे पहिल्या क्रमांकावर असून त्या विभागाचा निकाल 97.32 टक्‍के लागला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई विभाग असून त्या विभागाचा निकाल 93.87 टक्‍के लागला आहे. तर दिल्ली विभागाचा निकाल 89 टक्‍के लागला असून हा विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी हे चेन्नई विभागांतर्गत येतात. या परीक्षेत आंतरराष्ट्रीय शाळांमधील 15 हजार 674 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 14 हजार 881 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल 94.94 टक्‍के लागला आहे.

गुणांची टक्‍केवारी
वर्ष                 परीक्षार्थी          उत्तीर्ण                   टक्‍केवारी     उत्तीर्ण मुली         उत्तीर्ण मुले
2017           10,20,762       8,37,229            82.02        87.50%       78.00%
2018           11,06,772       9,18,763          83.01          88.31%       78.99%

शाळांच्या प्रकारनुसार उत्तीर्णतेची टक्‍केवारी
सरकारी शाळा 84.48
सरकारी अनुदानित शाळा 84.39
स्वयंअर्थसहाय्यित शाळा 82.50
जवहार नवोदय विद्यालय 97.97
केंद्रीय विद्यालय 97.78
केंद्रीय तिबेटीयन स्कूल 94.82

90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळणारे – 72 हजार 599 विद्यार्थी
95 टक्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे – 12 हजार 737 विद्यार्थी

बोर्डात पहिले पाच आलेले विद्यार्थी
विद्यार्थ्याचे नाव गुण
मेघना श्रीवास्तव, नोइडा 499
आशुतोष चंद्रा, उत्तरप्रदेश 498
चाहत बोधराज, जयपूर 497
आस्था बांबा, पंजाब 497
तनुजा काप्री, उत्तराखंड 497


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)