बारावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात?

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सध्या सर्वच विभागीय मंडळांमध्ये निकालाची लगबग सुरू असून, निकाल वेळीच जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

फेब्रुवारीत राज्यभरात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी त्यांनी बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. यामुळे अनेक उत्तरपत्रिका उशिरापर्यंत तपासल्या गेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर निकाल लांबणीवर जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी राज्य मंडळाने बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर केला होता. यावर्षी हा निकाल मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)