बारामती शहर फणफणले डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढली

बारामती, – बारामती शहरात सध्या डेंग्यूने थैमाण घातले आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्यात दोन विवाहीतांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात बहुतांश रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काही रुग्णांना उपचारादाखल पुणे शहरातील रूग्णांलयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. नगरपरीषद प्रशासन तसेच आरोग्य विभागामार्फत याबाबत खबरदारी तसेच उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी सर्व काही कागदोपत्री असल्याने शहराची आरोग्य स्थिती अलबेल आहे.
याबाबत ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. बारामती शहरात गेल्या 15 दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरु आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात डेंग्यू बळावत आहे. औद्योगिक परिसरात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने ठेवलेल्या तब्बल दोन हजार टायरमुळे या भागात डेंग्यूचे प्रमाण आधीक वाढत असल्याचा अंदाज प्रथमदर्शी बांधला जात आहे.
याबाबत परिवहन विभागीय कार्यालयाकडून गांभिर्यपूर्वक उपया योजना केली जात नसल्याने एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांसह आत डेंग्युची लागण शहरातील नागरिकांनाही होऊ लागली आहे. कार्यशाळा परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पडलेले दोन हजार टायर उचण्याबाबत तसेच एसटी कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना डेंग्यु झाल्यानंतरही परिवहन अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत. तसेच याबाबत नगरपरिषदेनेही त्यांना फटकारले नाही. याचा परिणाम म्हणून बारामती शहरात डेंग्युचे रूग्ण वाढू लागले आहेत. अस्वछता तसेच डबक्‍यात साठेलेल्या पाण्यामुळे डेगंयुच्या डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. मात्र, याकडे नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील कसबा येथिल उमा सोनवणे या महीलेचा (दि. 20) तर अमराई येथिल संगिता कुडवे या महीलेचा (दि. 25) रोजी उपचारादरम्यान मृत्यू डेंग्युमुळे झाला आहे. नगरपरिषदेने आता तरी याबाबत ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)