बारामती शहर अतिक्रमणांच्या विळख्यात

जळोची- लाखो रुपये खर्च करूनही पदपाथ अतिक्रमणामुळे नागरिकांना वापरता येत नाही. तर शहराला अतिक्रमणांचा विळखा पडल्याने रस्ते छोटे झाल्याने शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
शहराच्या मुख्यबाजार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुर्तफा पदपाथवर मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यामधून चालण्यावाचून पर्याय उरत नाही. काही व्यापाऱ्यांनी हातगाड्याधारकांना स्वतःच्या दुकानासमोरील पदपथ भाड्याने दिले आहे. दुचाकी चारचाकी वाहनधारक जागा मिळेल त्याठिकाणी अस्ताव्यस्त्य गाड्या लावत असल्याने बाजारपेठेतील सर्वच रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे.
बारामती नगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठिकठिकाणची अतिक्रमणे काढत आहे. या करिता अतिक्रमण हटाव पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी काढलेली अतिक्रमणे पुन्हा “जसे थै’ झाले. त्यामुळे पालिकेकडून करण्यात येणा-या तात्पुरत्या कारवाईमुळे शहरात पुन्हा वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.
शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळा ते इंदापूर चौक दरम्यान सर्वत्र अतिक्रमण बोकाळले आहे. बाजार परिसरातील रस्तेही निमुळते झाले आहेत. परिणामी, वाहतुकीवर विपरित परिणाम होतो. शहरातील बहुतांश भागात पालिकेच्या अधिग्रहण केलेल्या जागेवर पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते हटविण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 • हॉकर्स झोन आवश्‍यक-
  शहरातील फेरीवाल्यांच्या मनमानीला आवर घालण्यासाठी तातडीने हॉकर्स झोन तयार करण्याची गरज आहे. शहरातील विविध ठिकाणी हॉकर्स झोन निर्माण होऊ शकतात. नगरपालिकेने तातडीने पाठपुरावा करून झोन तयार केले तरच फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे गुदमरलेल्या रस्त्यांना मोकळा श्‍वास घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी निष्क्रिय प्रशासनाने सकारात्मक सक्रीय होण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
 • हातगाड्यावरचा व्यवसाय करणे अपरिहार्यता
  वाढती बेरोजगारी, घटनारे नोकऱ्यांचे प्रमाण, अन्य व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल या कारणांमुळे फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. हातगाडे खरेदी किंवा भाड्याने घेऊन बेरोजगार व्यवसाय करत आहेत. यामुळे त्यांच्या व्यवसायावर बंदी घालणेही योग्य होणार नाही. यामुळे सर्वसामान्यांचा होणार त्रास बेरोजगारांचा व्यवसाय यातून सुवर्णमध्य साधने आवश्‍यक आहे. हा सुवर्णमध्य हॉकर्स झोन तयार करूनच निघू शकतो असा विश्‍वास नागरिकांनी “प्रभात’कडे व्यक्‍त केला आहे.
 • नगरपरिषद नावालाच कारवाई करत आहे. कारवाई करताना देखील दुजाभाव केला जातो.
  – विजय पाठक, नागरिक, बारामती
 • शहरातील ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे. त्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्यात येईल.
  – राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग प्रमुख, बारामती नगरपरिषद

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)