बारामती लोकसभा मतदार संघात संविधान स्तंभ उभारणार

File photo

रेडा – राज्यात सर्वांत जास्त संविधान स्तंभ बारामती लोकसभा मतदार संघात उभारून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनोखा उजाळा देणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महात्मा फुले कॉलनी (उखळमाळ) शाखेचे उद्‌घाटन व जंक्‍शन, कळस, वालचंदनगर येथील 10वी व 12वी च्या गुणवंत विद्यार्थांचा गौरव खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यांत आला. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जेष्ठ नेते जगन्नाथ मोरे, सोनाई परीवाराचे प्रमुख दशरथ माने, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितिचे सभापती प्रविण माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष महारूद्र पाटील, हनुमंत कोकाटे, प्रफुल्ल चव्हाण, शुभम निंबाळकर, सागर मिसाळ, वैशाली पाटील, सारीका लोंढे, अलका शिंदे, अमोल मुळे, सोमेश्वर वाघमोडे, विनोद सपकळ, रेश्‍मा बनसोडे आदि उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खासदार सुळे म्हणाल्या की, भाजप सरकार कडून संविधानाचे जतन न करण्याचा प्रयत्न राजरोसपणे केला जात असल्याने संविधान बचाव कार्यक्रम राबवावा लागतोय हे दुदैव आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत घरोघरी पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे महत्वपुर्ण कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये संविधान स्तंभ उभारणी, संविधानाचे महत्व व जपणूक करण्यासाठी कार्य केले जाईल. महात्मा फुले यांना भारतरत्न मिळण्यासाठी मी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती, परंतु याची पोहच मिळाली नाही. तरीपण भारत रत्न मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशीही ग्वाही खासदार सुळे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदयोजक राज कुमार यांनी केले, तर आभार साबळे यांनी मानले.

ताई शेती महामंडळाच्या लोकांना न्याय दया
शेती महामंडळाच्या लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत. याशिवाय कर्मचारी वेतन प्रश्न, निवासी वसाहतीची समस्या सोडविण्यासाठी मी अनेक वेळा प्रश्न मांडले, परंतु यश आले नाही. सरकारने याची कधीच गंभीर दखल घेतली नाही, परंतु माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावावा आणि शेती महामंडळाच्या लोकांना ताई तुम्ही न्याय दया अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)