बारामती रुग्णालयाला आधार “ऑनकॉल’ डॉक्‍टरांचा !

असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती

जळोची – सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना मिळणारी वैद्यकीय रुग्ण सेवा ही “ऑनकॉल’ डॉक्‍टरांच्या आधारवरच मिळत असल्याचे चित्र सध्या आहे. येथील वैद्यकीय अधीक्षकांच्या अनेक तक्रारी असूनही वरिष्ठ पाठबळ देत असल्यामुळे नागरिकांना हे उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे.

बारामती नगरपालिकेच्या मालकीचे रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला सध्या 100 बेड आहेत. नगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या जागेवर टोलेजंग इमारत उभी राहिली. मात्र, वैद्यकीय अधिकारी वारवार रजेवर जात असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. येथील डॉक्‍टर केव्हाच वेळेवर भेटत नाही. त्यामुळे सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर आणि सर्वात जास्त आधार हा “ऑनकॉल’ डॉक्‍टरांचा आहे असे येथील नवीन शिकाऊ डॉक्‍टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. तर स्थानिक नागरिक संदिप पवार म्हणाले की, अत्यावश्‍यक सेवा येथे मिळत नाही. रात्री दरवाजा उघडला जात नाही. येथील चिंचोलीकर डॉक्‍टर भेटत नाही. अशा अनेक समस्या आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक मीरा चिंचोलीकर यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही.

खासगी रुग्णालयांमध्ये जावा
हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी व नियुक्‍त डॉक्‍टर जागेवर नसतात. रात्रीच्या वेळी तातडीची रुग्णसेवा मिळत नाही, अशी तक्रार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आहे. खर्च करण्याची ऐपत नसतानादेखील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करावे लागते. अथवा त्यांना तसा सल्ला याच रुग्णालयातून दिला जातो. त्यामुळे या हॉस्पिटलने शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयचा आदर्श घेणे गरजेचे आहे.

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पुन्हा चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- डॉ. शिवाजी शेळके, जिल्हा शैल्यचिकित्स्क, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)