बारामती-नीरा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवले

कोऱ्हाळे ते वाघळवाडी रस्त्याने घेतला मोकळा अश्‍वास

सोमेश्‍वरनगर- बारामती ते नीरा या राज्य मार्गवरील अतिक्रमण शुक्रवारी (दि. 15) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धडक कारवाई करून काढण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जलसंपदा विभागाच्या जागा बळकावत तेथे दुकाने थाटली जात होती, शासकीय जागाही बळकावण्याचा प्रकार होत होता, दुर्दैवाने अतिक्रमणांवर कोणतीही धडक कारवाई झाली नव्हती;परंतु कोऱ्हाळे ते वाघळवाडी येथे शुक्रवारी (दि. 15) अतिक्रमण हटवण्यासाठीची धडक कारवाई वडगांव निंबाळकरचे शाखा अभियंता एम. बी. खोसे व पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे. अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून बारामती-नीरा रस्त्याकडे पाहिले जातो. या मार्गावर माळेगाव आणि सोमेश्‍वर हे दोन सहकारी साखर कारखाने, या कारखान्यांची मोठमोठी शैक्षणिक संकुले, मार्गावरील अन्य गावांतील शाळा-महाविद्यालये रस्त्याच्या कडेलाच आहेत, 40 किलोमीटर अंतराचा हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने सध्या अपुरा पडतो होता. त्यातच छोट्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा टाकलेल्या दुकानांची संख्या वाढत चालली असून, त्याचा परिणाम रस्ता वाहतुकीवर, कोंडीवर होत असल्याने. ही कारवाई केली असे खोसे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)