बारामती तालुक्‍यात पालखी काळात वाहतुकीत बदल

बारामती, दि. 20 (प्रतिनिधी)- बारामती तालुक्‍यात संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शनिवारी (दि. 24) बारामती शहर वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे बारामती शहर पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले.

शहर वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे; शनिवारी (दि. 24) पहाटे तीन पासून पाटस रस्त्याने येणारी वाहतूक ही रिंग रोडने खंडोबानगर रस्त्याने कसबा कारभारी चौक मार्ग बारामती ते इंदापूर रस्त्याने बाहेर जाईल. भिगवण, बारामती एम.आय. डी. सी. रस्त्याने येणारी वाहतूक रिंग रोडने जळोची माळावरची देवीचे रस्त्याने इंदापूर-बारामती रस्त्याने बाहेर जाईल. बारामती ते पाटस रस्त्याला जाणारी वाहतूक ही बारामती ते भिगवण रस्त्याने विमानतळ मार्ग उंडवडी-सुपे मार्गे पाटस रस्त्याकडे जाईल.

बारामती ते इंदापूरकडे जाणारी वाहतूक ही गुनवडी, डोर्लेवाडी रस्त्याने वालचंदनगर रस्त्याने बाहेर जाईल. पालखी मुक्काम ठिकाण जवळ तीन हत्ती चौक व भिगवण चौक असून त्या रस्त्यावरील सर्व वाहतूक ही बंद करुन टि. सी. कॉलेज रस्त्याने बाहेर जाईल. बारामती शहरमध्ये कोणतेही मोठे वाहन जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. तर सोमवारी (दि. 26) संत सोपानकाका महाराज पालखीचे वेळी बारामती ते नीरा रस्त्याने जाणारी वाहतूक मोरगांव रस्त्याने पुण्याकडे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)