बारामती तालुक्‍यातील 23 जण हद्दपार

माळेगाव- निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर बारामती तालुक्‍यातील 23 जणांना रविवार (दि. 21) ते मंगळवार (डि. 23) पर्यंत मतदानाचा हक्‍क अबाधित राखून प्रवेश वास्तव्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत बारामती उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून पोलिसांना आदेश प्राप्त झाले असून तशी कारवाईही करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शांतता राहावी म्हणून बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केलेल्या कारवाईवरून व विनंतीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, या 23 जणांना मंगळवारी (दि. 23) मतदानची दोन तास सूट वगळून हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे; राहुल शशिकांत तावरे, धनंजय दत्तात्रय बर्गे, अतुल शशिकांत तावरे, निलेश श्रीरंग लोणकर, सोन्या उर्फ शिवाजी गोसावी, प्रसाद दीलीप तावरे, योगेश बापूराव तावरे, कल्याण अर्जुन तावरे, सागर उर्फ बाक्‍या बाळासाहेब तावरे, अशोक गणपत घुसळकर, अक्षय बाळासाहेब तावरे, उमेश बाळासाहेब अल्लाट, अक्षय विकास चव्हाण, प्रवीण चंद्रकांत गायकवाड, किरण भीमदेव लकडे, प्रफुल्ल सूर्यकांत जगताप, सोन्या ज्ञानेश्‍वर गोंडे, उमेश भगवान अडागळे, अंकुश भगवान अडागळे, संदीप भगवान अडागळ (सर्व माळेगाव बुद्रुक, ता. बारामती), सतीश गगन खरात, अजय सतिश खरात, विजय सतिश खरात (तिघे रा. शिरवली, ता. बारामती).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)