बारामती ‘कचऱ्यात’…

कचरा डेपोचा प्रश्‍न गंभीर : नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात; समस्या सोडविण्यात नगरपरिषद अपयशी

बारामती – शहरातील कचरा डेपोमुळे स्वच्छ सुंदर बारामती शहराचा कचरा झाला असल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. संपूर्ण शहरातील 30 टन कचरा प्रतिदिनी 22 एकराच्या भुखंडावर फेकला जात आहे. मात्र, कचऱ्याची व्हिल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नगरपरिषदेकडे कार्यन्वीत नाही. त्यामुळे हजारो टन साठलेला कचरा आगीत भस्मसात होत आहे. सलग 15-15 दिवस ही आग धुसमुसत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषद, नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी तसेच लोकाप्रतिनिधींकडे अनेकवेळा गाऱ्हाणे मांडले मात्र, अद्याप समस्या सुटली नाही. कचरा डेपो आधी की, तुमची घरे आधी असा प्रतिप्रश्‍न करुन निरुत्तर केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातून कचराडेपो हालवण्यासाठी नगरपरिषदेद्वरे अनेकावेळा प्रयत्न झाला मात्र, त्याला यश मिळाले नाही. तालुक्‍यातील काही गावातील मोकळ्या भूखंडावर कचराडेपो करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या गावातील नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला. तसा ठराव देखील ग्रामसेभेत केला. त्यामुळे शहरातील कचराडेपो दूर करण्याची मोहीम थंडावली. लोकप्रतिनिधी तसेच नगरपरिषदेने कचराडेपोमुक्‍त बारामती करण्यासाठी वारंवार वेगवेगळे प्रयत्न केले. त्याला अद्याप यश आले नाही. त्यामुळे शहरातील कचरा डेपोची समस्या कायम आहे. याची जाण देखील या भागातील रहिवाशांना आहे. मात्र, कचराडेपोच्या व्यवस्थापनाकडे नगरपरिषदेने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव म्हणाले की, बारामती शहरात प्रतिदिनी जवळपास 30 टन ओल्या व सुक्‍या कचऱ्याची निर्मिती होते. त्यामध्ये ओल्या कचऱ्याचे प्रमाण 80 टक्के आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. नगरपरिषदेबरोबरच नागरिकांनी देखील जागेवरच कचऱ्याची व्हिल्हेवाट लावण्यास पावले उचलणे गरजेचे आहे. कचराडेपोमुक्‍त शहर करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबबतचा डीपीआर शासनाकडे पाठवला आहे. टाटा कन्सल्टींगच्या माध्यमातून ते काम देखील प्रगतीपथावर आहे. काचरा डेपोमुक्‍त बारामती करण्यासाठी 3 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्याबाबतच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. घरातील ओला कचरा घराच्या बागेत अथवा इतर ठिकाणी जिरवण्याची प्रक्रिया, तसेच कचरा खाणारी टोपली हे उपक्रम सध्या शहरात राबवले जात आहेत. जेणेकरून या उपक्रमांद्वरे शहरातील प्रतिदिनी 10 टन कचरा जिरवला जाईल. याबाबत नगरसेवकांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रभागातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा नविन्यपूर्ण उपक्रम उपयुक्‍त ठरणारा आहे. कंपोस्टखत निर्मितीची यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्यात येणार आहे. जेणेकरुन तीन महिन्यांच्या कालावधीत कचरा डेपोमुक्‍त बारामतीच्या दिशेने वाटचाल होण्यास मदत होणार आहे. प्लॅस्टीक बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे, त्यामुळे शहरातील प्लॅस्टिक कचरा बंद होणार आहे. सध्या ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जात आहे. मात्र, त्याबाबत पाहिजे तेवढी सजगता नागरिकांमध्ये नाही. केवळ नगरपरिषदेच्या माध्यमातून ही समस्या सुटावी असे म्हणणे चुकीचे ठरेल, त्यासाठी नागरिकांचेही तेवढेच सहकार्य हवे, असे त्यांनी नमूद केले.

नक्की कोणाचे खरे?
कचरा डेपोबाबत प्रशासन उदासीन असल्याने कचरा अस्ताव्यस्त फेकला जात आहे. रात्री-अपरात्री खासगी वाहनातून वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टेज फेकले जात आहे. ओला व सुका कचरा शहरातून गोळा केला जात आहे. मात्र, कचरा डेपोवर तो एकत्र फेकला जात आहे. कचराडेपोला संरक्षीत भिंत नाही तसेच या ठिकाणी नगरपरिषदेचा एकही कर्मचारी कार्येरत नाही, त्यामुळे प्रशासनाचे कचराडेपोवर कसलेही नियंत्रण नाही याचा फायदा घेऊन सर्व प्रकारचा काचरा फेकला जात आहे. काही प्रकारचा कचरा जाळून त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी कचरा डेपोला आग लावली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर कचरा डेपोत मिथेन गॅसची निर्मिती होऊन डेपो पेट घेत असल्याचे नगरपरिषदेचे म्हणणे आहे.

शहरातील काचराडेपो नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहे. याबाबत विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. कचरा डेपोला आग लागल्यानंतर धुराचे लोट तयार होत आहे. संपूर्ण शहरात हा धूर पसरत आहे. या भागातील नागरिकांना श्‍वसनाचे त्रास सुरू झाले आहेत. नगरपरिषदेचे नियंत्रण नसल्याने कचराडेपोची समस्या वाढत चालली आहे. संरक्षित भिंत, सुरक्षा कर्मचारी, तसेच कचरा पेटू नये याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. परेश वाघमोडे, रहिवासी, बारामती

सध्या कचरा डेपो पेट घेत आहे. तसेच नगरपरिषदेकडून वेळोवेळी ती विझवण्यातही येत आहे. यापासून नागरिकांना त्रास होत असल्याचे मान्य आहे. त्यामुळे त्यांची या त्रासापासून कायमची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने प्रकल्प राबविले जाणार आहे. त्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. यात कचऱ्याचे ए, बी, सी, डीमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. तसेच प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्यासाठी प्रकल्प राबविला जाणार आहे.
-पौर्णिमा तावरे, नगराध्यक्ष, बारामती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)