बारामती उद्या महा रक्‍तदान शिबिर

शेटफळगढे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
वाढदिवसानिमित्ताने बारामती एमआयडीसीतील राजमुद्रा ग्रुपच्या वतीने महा रक्‍तदान शिबिराचे बुधवारी (दि. 19) आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात एक हजार रक्‍ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात येणार आहे. तरी या रक्‍तदान शिबिरामध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अमर घाडगे यांनी केले आहे. रक्‍तदान शिबीराचे हे दहावे वर्ष आहे. गतवर्षी 957 रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या होत्या. या वर्षीही महारक्‍तदान शिबिराचे ग्रामीण रुग्णालय रुई एमआयडीसी येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्‌घाटन जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच रुई, वंजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचेही घाडगे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)