बारामती आगाराचा गोंधळ संपता संपेना

File photo

मीनी बसेस बंद : लाल परी रिंगरोड मार्गे

बारामती- बारामती बस आगाराचा गोंधळ काही संपता संपेना बारामती आगारातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या बसेस या रिंगरोड मार्गे सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मिनी बस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती व तीन हत्ती चौक या बसथांब्यावरील प्रवाशांना वालीच उरला नाही. या प्रवाशांना रिक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची फारच मोठी गैरसोय झालेली आहे.
बारामती बस आगाराने लाल परी बस एमआयडीसीसाठी सुरू केली आहे. या बसेस कृषी उत्पन्न बाजार समितीमार्गे रिंगरोडने सरळ नवीन न्यायालयमार्गे पुढे एमआयडीसीकडे जातात त्यामुळे बारामती शहरातून औद्योगिक परिसरात जाणाऱ्या नोकरदार तसेच विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फारच मोठी गैरसोय झालेली आहे. लाल परी बस या शहरातून गर्दीमुळे नेता येत नाही याला पर्याय म्हणून हिरव्या रंगाची मीनी बस सुरू करण्यात आली आहे. मात्र या बसेसची बारामती आगारातील कार्यशाळेत दुरुस्ती होत नसल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणात धूराचे प्रमाण होत असल्यामुळे या बस बंद करण्यात आल्या आहेत. दुरुस्ती अभावी या बसेस रस्त्यावर कोठेही नादुरुस्त होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत असे. मीनी बस बंद झाल्यामुळे रेल्वेने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची फारच मोठी गैरसोय झालेली आहे. या प्रवाशांना रिक्षाशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. बारामती शहरातून विद्याप्रतिष्ठाणमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही चांगलीच गैरसोय झालेली आहे. याबाबत लवकरात लवकर मिनी बसेस सुरू कराव्यात अशी मागणी नोकरदारांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)