बारामती/निमसाखर-  बारामती शहर आणि परिसरासह इंदापूर तालुक्‍यातील निमसाखर परिसरात गडगडाटी वादळासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरण गारावा निर्माण झाला होता. दिवसभरच्या उकड्यानंतर रात्री नऊच्या सुमारास अचानक वादळास सुरुवात झाल्यानंतर पवासाला सुरुवात झाल्याने बारामतीकरांसह निमसाखर परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली होता. तर बारामतीत काही ठिकाणी झाडांचीही पडझड झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून लवकर सक्रिय होणार असून या मान्सूनपूर्व पावासाने खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्री उशिरापर्यंत पावसाची संतधार सुरूच होती. दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून नागरिक उकाड्याने हैराण झाले होते, त्यामुळे आज-उद्या पाऊस पडेल अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती मात्र, ती फोल ठरत होती अखेर आज रात्री मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांना काही काळ तरी गरमीपासून सुटक मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)