बारामतीमध्ये बौद्ध समाजाच्या मेळावा उत्साहात

बारामती- बौद्ध युवक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या बौद्ध समाजाच्या मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 25 हजाराहून अधिक समाजबांधवांची उपस्थिती या मेळाव्यास लाभल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी गायन केलेल्या भीम गीतांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. बौद्ध युवक संघटना बारामती यांच्या वतीने 62 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात मेडदचे माजी उपसरपंच अजित कांबळे यांनी बौध्द युवक संघटनेच्या वतीने विधायक कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ही संघटना करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.नगसेवक नवनाथ बल्लाळ यांनी प्रत्येक गावात बौद्ध युवक संघटनेच्या वतीने शाखा स्थापन करून समाजातील गरजू, गरीब विद्यार्थी यांना संघटनेच्या वतीने मदत केली जाणार असल्याचे सांगितले.नगरसवेक गणेश सोनवणे यांनी संघटना यापुढील काळात सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार असून संघटनेच्या उपक्रमात समाजबांधवांनी सहभागी व्हावे,असे आवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)